मतिमंद विद्यार्थ्यांच्या सानिध्यात माजी विद्यार्थ्यांनी दिली आठवणींना मेळावा

1
शेअर करा !

पाचोरा प्रतिनिधी । येथील पी.के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मतिमंद विद्यार्थ्यांच्या सानिध्यात मेळावा आयोजित आयोजित करून नवीन पायंडा घालून दिला.

येथील २६ जानेवारी प्रजाकसत्ता दिनानिमित्त पी के शिंदे माध्यमिक विद्यालयांच्या २०१२ सालाच्या इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्यांनी युथ एम्स ग्रुपच्या माध्यमातून संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित कै. कालींदीबाई पाडे मतिमंद निवासी विद्यालयात स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन प्रदीप पांडे, श्रीकृष्ण दलाल, वैशाली दलाल, सूर्यकांत निकम यांची उपस्थिती होती. या वेळी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने समाधान लाभल्याचे माजी विद्यार्थ्यांसह मतिमंदत्व विद्यार्थ्यांशी दुपारी स्नेहभोजनानंतर गप्पा गोष्टी झाल्या. या वेळी मतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता. या स्नेह मेळाव्यात विविध क्षेत्रात काम करणार्‍या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत गेल्याचा सुखद अनुभव घेण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी मतीमंद निवासी विद्यालयात फॅन भेट देण्यात आले.

युथ एम्स ग्रुपचे हर्षल मराठे, कुणाल वसाने, शुभम पाटील, गणेश सिनकर, स्वप्नील दुसे, देवेन निकम, किरण पाटील, अश्‍विनी दलाल, अम्रिता चंदिले, हर्षाली अहिरे, अश्‍विनी पाटील, भाग्यश्री गोसावी आदींनी आठवणी व्यक्त केल्या.

आम्हाला फॉलो करा
1 Comment
  1. Nutan says

    Nice… Keep it up

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!