मटका किंग जिग्नेश ठक्करचा खून ; कार्यालयातून बाहेर येताच झाडल्या गोळ्या

शेअर करा !

कल्याण (वृत्तसंस्था) ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि पत्त्यांचे क्लब असणारा मटका किंग जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ही हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

store advt

जिग्नेश शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन परिसरातील नीलम गल्लीत आपल्या कार्यालयाबाहेर बसला होता. आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी रात्री जिग्नेश कार्यालयाच्या बाहेर आला. त्याचवेळी घात लावून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या छातीत चार गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर जिग्नेशला कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, अवैध धंद्यातील स्पर्धेतून जिग्नेशची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या तपासासाठी पथकं रवाना केली आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!