मजुराची दुचाकी लांबविली

नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशीराबाद गावातील ऊरुसमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये लावलेली २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरुन नेल्याप्रकरणी सोमवार, २३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नशीराबाद गावातील शाह करीम मोहल्ला येथे शेख अहमेद शेख सत्तार वय ३२ हे वास्तव्यास आहेत. नशीराबाद गावात सध्या ऊरुस सुरु आहे. या ऊरुसमध्ये १६ जानेवारी रोजी शेख अहेमद हे आले होते. यादरम्यान ९ वाजेच्या सुमारास त्यांनी एका पत्र्याच्या शेडच्या बाजूला त्यांनी त्यांची एम.एच. १९ डी.जी. २५८९ या क्रमाकांची दुचाकी उभी केली होती. दीड तासानंतर शेख अहेमद हे पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी परत न मिळाल्याने शेख अहेमद यांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content