मंत्रीपद द्यायचे असेल तर . . .! : अमित ठाकरे यांचे मोठे विधान  

अंबरनाथ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात मनसेचा समावेश असेल काय ? याबाबत चर्चा सुरू असतांनाच अमित ठाकरे यांनी या संदर्भात एक मोठे विधान केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी यांनी काल रात्री अंबरनाथला भेट दिली. याआधी संवाद दौर्‍यात अमित ठाकरे यांनी मुंबई ते अंबरनाथदरम्यान लोकलने प्रवास केला. यानंतर अमित ठाकरे यांनी प्राचीन शिवमंदिराला भेट देऊन पत्रकारांशी साधला.

या वेळी मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गृहमंत्री पद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ असे म्हणत पण ते देत नसल्याचे प्रतिपादन अमित ठाकरे यांनी केले. अर्थात, त्यांच्या या मिश्कील उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.