मंत्रालयातील महत्वपूर्ण पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली

uddhav thackera 11

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील पाच महत्वपूर्ण सनदी अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

 

ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची बदली गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. यात महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची बदली वन विभागात झाली आहे. ते आतापर्यंत महसूल विभागात कार्यरत होते. वन विभागातील प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांची उद्योग विभागात ट्रान्स्फर करण्यात आली आहे. संजय खांदारे यांची अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची बदली महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. करीर यांच्या जागी आय. एस. चेहेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चहल आतापर्यंत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव होते.

Protected Content