भुसावळ येथील सराईत गुन्हेगाराला केले स्थानबध्द

येरवडा मध्यवर्ती कारागृहात केली रवानगी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून त्यास पुण्यातील येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी गुरुवार, ९ मार्च रोजी प्रसिध्दीसाठी दिली आहे. जितेंद ऊर्फ मोनू रामदास कोल्हे वय ३४ रा. अमरनाथ नगर, भुसावळ असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

सराईत गुन्हेगार जितेंद्र ऊर्फ मोनू रादास कोल्हे वय ३४ याच्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे ७, तर पाच अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत, तर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे दाखल असून एकूण पाच अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो पुन्हा जामीनावर सुटल्यावर गुन्हे करत होता, त्यामुळे त्याच्यावर एमपीडीएच्या कारवाई करण्याबाबतचा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता, या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ८ मार्च रोजी गुन्हेगार जितेंद्र कोल्हे याच्यावर एमपीडीएच्या कारवाईचे तसेच त्याच्या स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह भुसावळ पोलिसांनी गुन्हेगार जितेंद्र कोल्हे यास ताब्यात घेवून पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content