भुसावळ बाजार समिती सभापतीपदी अनिल वारके तर शिवाजी पाटील उपसभापती !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजप प्रणित पॅनलचे अनिल वारके तर उपसभापतीपदी शिवाजी पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

 

काही दिवसांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. यात भाजप प्रणित पॅनलला मविआ प्रणित पॅनलने टक्कर दिली होती. या माध्यमातून एकीकडे आमदार संजय सावकारे तर दुसरीकडे आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात चुरशीची लढत झाली. यात तब्बल १५ जागा जिंकून भाजप प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला होता. तर विरोधकांना अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. निवडणूक झाल्यानंतर सभापती व उपसभापतीपदाबाबत उत्सुकता लागली होती.

 

या अनुषंगाने आज बाजार समितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात सभापतीपदासाठी अनिल वारके तर उपसभापदीपदासाठी शिवाजी पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच मोठी आतषबाजी करत या निवडीचे स्वागत करण्यात आले. तर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी युवराज लोणारी तसेच माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी  नवनियुक्त सभापती आणि उपसभापती यांचे स्वागत केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content