भुसावळ गोळीबार : बेकायदेशीर गावठी पिस्तूलासह दहावा आरोपी अटकेत

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लिम कब्रस्थानाजवळ गोळीबार प्रकरणातील दहाव्या आरोपीला गावठी पिस्तूलासह पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

store advt

शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ चाळीस वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुरुन. ३७७/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुर्वी या गुन्ह्यात सुरूवातील सात आरोपींना अटक केली आहे. दोन दिवसांपुर्वी दोन आरोपी असे एकुण ९ आरोपी झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी १५ जुलै रोजी पहाटे पाच वाजता संशयित आरोपी सुरेश सपकाळे याला अटक केली होती त्याच्या ताब्यातील एक गावठी कट्टा आणि पाच काडतुसे हस्तगत केली होती. दरम्यान त्यांची कसुन चौकशी केली असता आठवड्यापुर्वी झालेल्या गोळीबारात याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गोळीबार प्रकरणातील सुरेश सपकाळे रा. ध्यान केंद्रजवळ भुसावळ हा दहावा संशयित आरोपी ठरला आहे. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घराच्या मागे एक गावठी कट्टा आढळून आला.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!