भुसावळात मुस्लीम बांधवांनी काढला शांततेत जुलूस (व्हिडिओ)

भुसावळ, दत्तात्रय गुरव | जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या सशर्त परवानगीने केवळ भुसावळ येथे ईद-ए-मिलादचा जुलूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांततेत काढण्यात आला.

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमपाळून भुसावळ शहरातील रजा टाॅवर येथून ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांततेत जुलूस काढण्यात आला. जुलूस १५ बंगला व विविध भागात फिरून त्याची सांगता रजा टाॅवर करण्यात आली. जुलूसचे वैशिष्ट म्हणजे यात फक्त मौलाना व विविध मस्जिदचे ट्रस्टी यांनी सहभाग घेतला. त्यांनी शासनाचे नियमांचे पालन करून मुस्लीम बांधवानी या जुलूसमध्ये सहभाग न घेता सहकार्य करावे असे आवाहन केले होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!