भुसावळात भारतीय किसान संघाचे तहसीलदारांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । भारतीय किसान संघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले.

 

भारतीय किसान संघाच्या माध्यमातून जय जवान जय किसान घोषणा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या पुण्यतिथी दिनी देशभरात विविध ठिकाणी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून राष्ट्रपती महोदय यांना तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून निवेदन देण्याचे ठरवले होते.

परंतु जिल्हा प्रशासनाने लावलेल्या निर्बंधामुळे ठिय्या आंदोलन न करता ठराविक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भुसावळ येथील तहसील कार्यलयात निवेदन देण्यात आले. निवेदनात उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य सुनिश्चित करने याबाबत भारतीय किसान संघ आग्रही आहे आणि सरकार ने ते लवकरात लवकर निश्चित करावे असे म्हटले आहे. निवेदन देतांना भारतीय किसान संघाचे तालुका कार्यकर्ते संजय पितांबर झोपे, सुशील भरत झोपे, भूषण सुनील धनगर, श्रीराम एकनाथ भोई उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!