भुसावळात बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक; एलसीबीची कारवाई

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका चौफुली परिसरात एक तरूण गावठी बनावटीचे पिस्टल घेवून फिरत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल हस्तगत केले असून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

store advt

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील खडका परिसरात संशयित आरोपी अरबाज आरीफ पटेल (वय-२२) रा. पटेल कॉलनी हा तरूण हातात गावठी बनावटीचे पिस्टल घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन , शरीफोद्दीन काझी , युनुस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव अशांना भुसावळला रवाना केले. पथकाने सापळा रचत खडका चौफुली ते भुसावळ शहरात जाणाऱ्या रोडवरील इकरा मदरसा रोडजवळ उभा असतांना अटक केली व त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्टल हस्तगत केली. संशयित आरोपी अरबाज पटेल यांच्या विरोधात आर्म ॲक्ट कायद्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!