भुसावळात पिस्तुलासह आरोपी अटकेत; एलसीबी पथकाची कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सराईत गुन्हेगार तथा आर्म अ‍ॅक्टमध्ये आधी हवा असणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडचे पिस्तुल जप्त केले आहे.

store advt

याबाबत वृत्त असे की, अरबाज आरीफ पटेल (रा. पटेल कॉलनी, भुसावळ) हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर बाजारपेठ पोलीस स्थानकात आर्म अ‍ॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, एलसीबीच्या पथकाला तो भुसावळमध्ये असल्याची माहिती मिळाली या अनुषंगाने सहाय्यक फौजदार अशोक महाजन,पो.हे.का. शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड, पोकाँ रणजित जाधव यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील कारवाई साठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर अधिक्षक भाग्यश्री नवटके व एलसीबीचे निरिक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

error: Content is protected !!