भुसावळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई (व्हिडिओ)

शेअर करा !

भुसावळ, प्रतिनिधी । नगरपालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने आज रस्त्यावर हातगाडी लावुन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर व दोन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे .

store advt

भुसावळ शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे .कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडुन उपाययोजना केल्या जात आहे . नागरीकांची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने व्यावसायिकांना व दुकानदारांना काही ठराविक दिवस व वेळ ठरवुन देण्यात आली आहे. मात्र काही व्यावसायिक व दुकानदार नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्याने आज शहरातील खडका रोडवरील दोन दुकाने सील करण्यात आली तर दोन दुकानदारां कडुन प्रत्येकी पाच हजार रूपये दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यावर परवानगी नसतांना व्यवसाय करणाऱ्याचा माल जप्त करण्यात आला आहे . नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरूच राहिल असे नगरपालिका पथकाचे प्रमुख संजय बानायते यांनी सांगितले. हि कारवाई नगर अभियंता पंकज पन्हाळे , परवेज शेख , राजु पाटील , अनिल भाकरे यांच्या पथकाने केली.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!