भुसावळात दोन गावठी पिस्टलासह तरूणाला अटक

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरात गावठी बनावटीचे दोन पिस्टलसह एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टिंबर मार्केट येथून अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

store advt

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरात एका व्यक्ती दोन गावठी बनावटीचे पिस्टल घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पोलिस निरीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकाने शहरातील टिंबर मार्केटमधील संत गाडगेबाब शाळेच्या भितीजवळ संशयित आरोपी आकाश गणेश राजपूत (वय-२१) रा. शिरपूर कन्हाळा रोड, नारायण नगर भुसावळ याची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील ६० हजार रूपये किंमतीचे दोन गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत केली. बेकायदेशीररित्या विनापरवाना गावठी पिस्टल घेवून फिरणाऱ्या प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!