भुसावळात दोन गावठी कट्टयांसह तरूणाला अटक

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरात आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन गावठी कट्टयांसह एका तरूणाला अटक केली असून या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

store advt

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अनेकदा गावठी कट्टे जप्त करण्यात येत आहेत. यातच काल रात्री गोळीबाराची घटना देखील घडली. या पार्श्‍वभूमिवर, आज एलसीबीच्या पथकाने दोन गावठी कट्टयांसह एकाला अटक केले आहे. सहाय्यक फौजदार अशोक महाजन
पो.हे.का. शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड पोकाँ रणजित जाधव व अरुण राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांनी आकाश गणेश राजपूत ( रा. नारायण नगर, भुसावळ) याला दोन गावठी कट्टयांसह अटक केली. त्याच्यावर भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. भाग ६ सी.आर.नं.७२५ आर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध सुरू होता. या पार्श्‍वभूमिवर, आज त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून ०२ गावठी कट्टे अशा मुद्देमालासह पुढील कारवाई साठी रिपोर्टने भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. च्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!