भुसावळात डंपरच्या धडकेत वृध्द जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गोपाळ पोलीस चौकीजवळील रोडवर उभ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वृध्द व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली होती. यात जखमी झालेल्या वृध्दाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रीतपालसिंग जसवंतसिंग नेब (वय-७७, रा.गजानन महाराज नगर, भुसावळ) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 17 ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रीतपाल सिंग नेब हे वृध्द भुसावळ शहरातील गोपाळ पोलीस चौकासमोरील रोडजवळ दुचाकी घेऊन उभे होते. त्यावेळी भरधाव येणारा डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ३५१३) याने उभ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत वृध्द हे गंभीर जखमी झाले, जखमी वृध्दाला भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर अखेर मंगळवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर वरील चालक अशोक किरण पवार रा. दिघे ता. जळगाव याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

 

Protected Content