भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे सुपुर्द करण्यावरून पवार नाराज

शेअर करा !

sharad pawar new 696x447

कोल्हापूर । भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपुर्द करण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भीमा-कोरेगावचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. या पार्श्‍वभूमिवर, कोल्हापुरा आज शरद पवार म्हणाले की, भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, भीमा कोरेगावबाबत इथल्या राज्याच्या गृहखात्याच्या अधिकार्‍यांची वागणूक अक्षेपार्ह आहे, अशी तक्रार आमच्याकडं अनेकांनी विशेषत: जैन समाजाच्या लोकांनी केली आहे. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होताच केंद्रानं हा तपास राज्याकडून काढून घेतला होता. घटनेनुसार कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे. असं असताना आपला अधिकार त्यांनी काढून घेणं योग्य नाही. तो अधिकार कुणी काढत असेल तर त्यास पाठिंबा देणं योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!