भावना गवळी समर्थक शिंदे गटात दाखल

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

 

खासदार भावना गवळी यांनी आधीपासूनच भाजपशी जुळून घेण्याची मागणी केली होती. तसेच मातोश्रीवरील बैठकीत त्या उपस्थित नव्हत्या. यामुळे त्यांची पक्षाच्या प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर, आता यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पिंटू बांगर यांच्यासह ३० समर्थकांनी आज आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले. यात नगरसेवकांसह अन्य महत्वाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. या पाठोपाठ मतदारसंघातील भावना गवळी यांचे समर्थक देखील याच प्रकारे शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे येथे शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.