भारुड खेडा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भारुड खेडा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

 

भारुड खेडा गावी सोमवार दि. १३ जून रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्या हस्ते फटाक्यांची अतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात शिवसेना शाखेचे फलक अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे, जिल्हा उपसंघटक सांडू मामा गुरव, भरत पवार, रोजगार हमी सदस्य कृष्णा चोरमारे, मोहन जोशी, विनोद जोशी चिचखेडा उपसरपंच, अमित तडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बस स्टँड परिसरात शिवसेना शाखा फलक अनावरण शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिवसेना शाखाप्रमुख प्रभाकर जगताप, उपशाखा प्रमुख सुनिल गोसावी, नितीन तडवी, सुभाष देवरे, सरवर तडवी, गजानन कुरूनळ, युवा सेना अधिकारी गजानन चव्हाण, कोमल सिंग राजपूत, कैलास गोसावी, निलेश देवरे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!