भारतीय जवानांनी केले दोन दहशतवादी ठार

श्रीनगर वृत्तसंस्था । सीआरपीएफच्या जवानासह एका मुलाची हत्या करणार्‍या दोन दहशतवाद्यांना आज भारतीय जवानांनी चकमकीत ठार केले आहे.

store advt

याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी सीआरपीएच्या जवानासह एका मुलाची हत्या केली होती. या दहशतवाद्यांच्या शोधात भारतीय जवान होते. त्यांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली होती. यात पहाटे दहशतवादी व भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. यात दोन दहशतवादी ठार झाले असून इतरांचा शोध घेण्यासाठी परिसरात मोहीम राबविण्यात येत आहे. जम्मू-काश्मिरात अलीकडच्या काळात २९ विदेशी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर, जवानांनी शोध मोहिम राबवून दोघा दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे.

error: Content is protected !!