भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने पंतप्रधानांच्या वाढदिवशी लसीकरण

पारोळा प्रतिनिधी  । शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या वाढदिवसाचे औचित्य भारतीय जनता पक्षाच्या सेवा व समर्पण या उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालयात  लसीकरण व फळ वाटप करण्यात आले.

 

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोव्हीड लसींचा तुटवडा असल्याने अनेक नागरिक लसीकरण करण्यासाठी ताटकळत होते. त्या अनुषंगाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारोळा तालुका भाजपातर्फे जिल्हा लसीकरण प्रमुखांकडे ग्रामीण रूग्णालयामार्फत लस उपलब्ध व्हावी याकरिता पाठपुरावा सुरु होता. तसेच अतिरिक्त लस उपलब्ध करून दयावी म्हणून भाजपातर्फे मागणी पत्र देखील देण्यात आले होते. सदर मागणी मंजूर करित आज पारोळा ग्रामीण रुग्णालयास ५००  लस तर भाजपाकडून करण्यात आलेल्या मागणी नुसार १०००  लस अशा १५००  लसी उपलब्ध करून देण्यात आल्या.

लस उपलब्ध  झाल्यावर  ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, संघाचे व भाजपाचे कार्यकर्त्यांकडून नोंदणी करण्यात आली. तसेच डॉ. प्रशांत गुजराथी, डॉ. धनराळे, विदया अहिरे , राखी बडगुजर ,विनय कांबळे यांचे मार्फेत लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष अॅड. अतुल मोरे ,शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई चौधरी ,जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील ,जिल्हाशिक्षक आघाडीचे जितेंद्र चौधरी ,नरेंद्र राजपूत , सरचिटणीस सचिन गुजराथी , गणेश पाटील, विनोद शेठ हिंदुजा, अमोल चौधरी, गौरव बडगुजर, समिर वैद्य, माणिकलाल जैस्वाल, अॅड. गणेश पाटील, अनिल लोहार ,नयन चौधरी, स्वप्निल महाजन, जयेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी राजूभाऊ वानखेडे यांचेही सहकार्य लाभले.

 

Protected Content