जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवार १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता नियोजन भवनात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत १ एप्रिल ते १ मे, २०२३ या कालावधीत राज्यभरात सामाजिक न्याय पर्व २०२३ विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून साहित्यिक वासुदेव मुलाटे यांचे १४ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.