भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागितली परवानगी

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मौजे मोहराळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिर्ण झालेला पुतळा काढुन नविन पुर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी परवानगी व मार्गदर्शन मिळणे असे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांना देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, यावल तालुक्यातील मौजे मोहराळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दि. २४ एप्रिल १९८५ रोजी बसवण्यात आलेला आहे. सदर पुतळ्यास सुमारे ३५ वर्ष होवुन अधिक जास्त दिवस झालेले आहे. उन पाऊस व वारा यामुळे सदर पुतळयाची अवस्था जिर्ण व खराब झालेली आहे. पुतळ्याच्या मागच्या बाजुस तळा गेलेल्या आहेत. त्यामुळे नविन पुतबा बसवणे व नुतनीकरण करण्यासाठी सर्दभीय निवेदनामध्ये विनंती करण्यात आलेली आहे. पुतळा नुतनिकरणासाठी प्रशासनाची परवानगी घेणे हि आवश्यकत बाब आहे म्हणुन परवानगी घेणेसाठी ग्रामपंचायतीने सक्षम अधिकारी यांचेकडे अर्ज करुन रितसर परवानगी घेवुन पुतळ्याची नुतनिकरण करावे. म्हणुन ग्रामपंचायतीचा मासिक ठराव झालेला आहे. ग्रामपंचायतीचे मासिक ठरावामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा असे सर्वानुमते ठरल्यामुळे सदर पुतळा नुतनिकरणासाठी योग्य ती परवानगी व मार्गदर्शन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मोहराळा हरीपुरा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच जहाँगीर तडवी , ग्राम पंचायत सदस्य अनिल अडकमोल, भरत महाजन , संजय पाटील , सतीष अडकमोल यांच्या स्वाक्षरी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content