भाजप सोबत परमवीरसिंग यांचे डील !- नवाब मलिक

मुंबई प्रतिनिधी । तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी  भाजपसोबत  डील केल्यानेच त्यांचे नाव एनआयएनने आरोपपत्रात घेतले नसल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

 

तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा छखA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमवीरसिंग यांनी भाजपसोबत  मडीलफ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. छखA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमवीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या मडीलफ मुळे एनआयएने परमवीरसिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता भाजप एनआयएला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही हे सांगत आहेत हे एकदम हास्यास्पद असल्याचा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!