मुंबई प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही याबाबत आजपासून भाजप आणि शिवसेनेचे मंथन सुरू होणार आहे.
जालना येथे आज भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणज अर्थातच युतीचा असणार आहे. युतीबाबत नेत्यांतर्फे काय संकेत मिळतात याबाबत सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे आज मातोश्रीवर शिवसेनेची महत्वाची बैठक होत आहे. यामध्ये उध्दव ठाकरे हे आपल्या खासदारांचे युतीबाबत मत जाणून घेणार आहेत. यानंतर ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहे. यामुळे आज भाजप आणि शिवसेनेचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.