भाजप नेते पी.सी. पाटील यांच्यातर्फे रोगप्रतिकारक औषधीचे वाटप

शेअर करा !

धरणगाव प्रतिनिधी । भाजप नेते पी.सी. पाटील यांच्यातर्फे मतदारसंघातील जनतेची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या हेतूने आर्सेनिक अल्बम-३० या औषधीचे वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पी.सी. पाटील यांच्या वतीने आज धरनगाव तालुक्यात कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी होमिओपॅथीक औषधी अर्सेनीक अल्बम यांचे मोफत वाटप तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये करण्यात येणार आहे. या अनुषंगाने वंजारी खपाट येथे त्यांच्या पत्नी सौ वैशालीताई पाटील यांच्या उपस्थिती औषधी वाटप करण्यात आले. सरपंच गोपाल आण्णा तसेच गावातील आबा पाटील, भरत महाजन, दिलीप महाजन,विक्रम महाजन, कैलास महाजन, संजू महाजन व ग्रामस्थांना ही औषधी देण्यात आली. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच महीला वर्ग, परिसरातील डॉ. श्रीकांत पाटील, सोनवद सरपंच निर्दोष भाऊ, डॉ संदीप पाटील, कैलास पाटील,राकेश ननावरे, सरपंच बांभोरी, विशाल पाटील, भिका पाटील या आबासाहेब पी. सी. पाटील युवा मंंच चे कार्यकर्ते तसेच परिसरातील भाजपा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!