भाजप आमदाराला कोरोनाची लागण ; राज्यातील बड्या नेत्यांच्या संपर्कात

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे लांडगे हे राज्यातील काही बड्या नेत्यांच्या बैठकांना हजर असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

store advt

 

 

आमदार लांडगे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्या बैठकीला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतलेल्या बैठकिला ते उपस्थित होते. एवढेच नव्हे तर, सहा दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण या कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयात प्रशासनाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आमदार महेश लांडगे फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ होते.

error: Content is protected !!