भाजप आमदारसह कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण !

शेअर करा !

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) भाजप प्रदेश सरचिटणीस आणि आमदार सुजितसिंह ठाकुर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुजितसिंह यांच्यासह कुटुंबातील ६ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

सुजितसिंह ठाकुर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, ३ ऑस्टपासून बाहेर मी कोणाचाही संपर्कात आलो नाही. मंगळवारी ४ ऑगस्टला कुटुंबातील सर्वांची रॅपीडड अॅन्टीजन टेस्ट झाली. कुटुंबातील ६ सदस्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी केली आहे. त्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची प्रकृती चांगली आहे. लक्षणे नाहीत. काळजी घेतो आहे. आपणही आपली व परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!