भाजप अनु. जाती मोर्चा कार्यकारिणी सदस्यपदी प्रकाश कांबळे

पाचोरा, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा (ग्रामिण) जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी तालुक्यातील निपाणे प्रकाश अशोक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी अनु. जाती मोर्चाचे ग्रामीण संघटन वाढविणे कामी व केंद्र शासन यांनी मागासवर्गीय (अनु. जाती) साठी विविध योजनांचे माध्यमातून घेतलेले निर्णय यांचा प्रसार करणेसाठी तसेच भाजपा जिल्हा भक्कम व मजबुत करणेसाठी प्रकाश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती भाजपा अनु. जाती मोर्चा (ग्रामिण) अध्यक्ष विकास अवसरमल यांनी केली आहे. प्रकाश कांबळे यांना आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते सदरचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल प्रकाश कांबळे यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!