भाजपा सदस्य सभागृहातील आसन व्यवस्था बदलण्यावरून आक्रमक (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोविड काळानंतर ऑफलाईन दुसऱ्या महासभेत भाजपने आक्रमक होत सभा गाजवली. सभागृहातील सदस्यांची आसन व्यवस्था बदलण्याच्या कारणावरून बैठे आंदोलन पुकारले होते. मात्र, विरोधीपक्षनेता यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महासभा सुरु होण्यापूर्वी भाजप सदस्यांनी सभागृहात येताच त्यांची आसन व्यवस्था बदलण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. हा प्रकार उघड होताच भाजप सदस्यांनी विंगमध्ये आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. यावेळी भाजपच्या सर्व सदस्यांनी पीठासन अधिकाऱ्यांच्या समोरील विंगेत बैठे आंदोलन करण्यासाठी तयारी केली होती. यानुसार भाजपच्या सर्व महिला सदस्या विंगेत उतरल्या. सभागृहातील आसन व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांनी विश्वासात घेतला नसल्याचा आरोप केला. मात्र, वेळीच विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी या आक्रमक भाजपा सदस्यांची मनधरणी करून पुढील सभेत आसन व्यवस्था पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासभेच्या कामकाजास सुरळीत झाले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!