भाजपा मेळाव्यात रागिणी फाउंडेशन केलेल्या स्वागताने सर्वांचे वेधले लक्ष

यावल,  प्रतिनिधी ।  येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजीत कार्यकर्ता बुथ मेळावा कार्यक्रमा प्रसंगी व्यास पिठावरील मान्यवरांचा करण्यात आलेल्या सत्काराने सर्वांचे लक्ष वेधले.

 

काल यावल येथील धनश्री चित्र मंदीर चित्रपटगृहात पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुका शाखेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य बुथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीष महाजन,  खासदार रक्षाताई खडसे , भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व आमदार राजुमामा भोळे , जिल्हा परिषदच्या अध्यक्ष ना. रंजनाताई पाटील या सर्वमान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हे स्वागत भाजपा सदस्य तथा रागिनी फाउंडेशन सावखेडासिम तालुका यावलचे अध्यक्ष आणि आदिवासी चळवळीतील युवा नेतृत्व  सलीम तडवी सर व त्यांच्या सोबत भाजपाचे तालुका चिटणीस उदय बाउस्कर , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राहुल बारी यांनी मान्यवरांचे केले. त्यांनी केलेल्या जल्लोषातील स्वागत सत्कार हे सर्वांचे लक्ष वेधणारे होते.  यावेळी स्वागतकर्ते सलीम तडवी सर मान्यवरांना स्मृतीचिन्ह देवुन सत्कार केले .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!