भाजपाद्वारा महापालिकेत फॉंगिंग : सत्ताधारी व प्रशासनाचा केला निषेध (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  महापालिकेच्या प्रांगणात भारतीय जनता पक्षा महानगरतर्फे  शहरातील वाढत्या डेंग्यू व मलेरियाच्या साथीचे आजार रोखण्यास सत्ताधारी व प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले साथीचे आजार आटोक्यात येण्यासाठी फवारणी व इतर  उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आले आली, या संदर्भातील  निवेदन आयुक्तांना देण्यात आले.

 

शहरात साथीच्या आजाराच्या रुगांची वाढ होत असतांना महापालिकेत १५ ते १६ फॉंगिंग मशीन असतांनाही कुठलीही फवारण केली जात नाहीये. याचा निषेध करण्यासाठी यावेळी फॉगिंग मशीनची  हळद-कुंकुमतिलक करून पूजा करण्यात आली. यानंतर याच मशीनने महापालिकेत फवारण करण्यात आली. यात महापालिकेतील फॉंगिंग मशीन पूजेसाठी नाहीये, त्याचा वापरही करा, असा उपरोधीक संदेश भाजपतर्फे या आंदोलनातून देण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेता भगत बालानी, स्थायी समिती सभापती राजेंद्रजी घुगे पाटील, माजी महापौर सीमा भोळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्‍याम चौधरी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बंडाळॆ, नगरसेवक कैलास सोनवणे, महेश चौधरी, अॅड. सुचिता हाडा, दीपमाला काळे, अमित काळे, किशोर चौधरी, जितेंद्र मराठे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, मयूर कापसे, महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, आघाडीचे सुरेश सोनार, दीपक बाविस्कर, हेमंत जोशी, सीडी पाटील, प्रभाकर तायडे, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, शक्ती महाजन, संजय लुल्ला, डॉ. चंद्रशेखर पाटील, सदाशिव ढेकळे, विठ्ठल पाटील, जीवन अत्तरदे, शक्ती महाजन, कार्यालय मंत्री प्रकाश पाटील, व सनी महाजन आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 

भाग १

भाग २

भाग ३

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!