जळगाव प्रतिनिधी । शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज शहरातील महाबळ परिसरात भाजपा मंडल ९ च्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी मंडल क्र.९ चे अध्यक्ष निलेश भाऊ कुळकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जळगांव महानगराचे महानगर सरचिटणीस महेश जोशी, नितीन इंगळे, चिटणीस, भाऊ वाघ, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, गौरव पाटील, मंडळ सरचिटणीस अनंत देसाई, संजय तिर्मले, मंडळ उपाध्यक्ष रवींद्र भाऊ सपकाळे, सुरसिंग पाटील, नगरसेवक उज्वला बेंडाळे, सुरेखा तायडे, गायत्री राणे, जितेंद्र मराठे, प्रभाग समिती सदस्य संजय विसपुते, भूपेश कुळकर्णी, मंडल युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत भंगळे, ओम बेंडाळे, तेजस जोशी, जयश्री पाटील, विद्या वाणी, भारत बेंडाळे, उदय पवार, इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.