भाजपच्या मंगला अंगडी विजयी

 

बेळगाव : वृत्तसंस्था । या  लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा 1622 मतांनी विजय झाला आहे.

 

 

:  बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा  निकाल  आज जाहीर झाला. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. यात भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी , तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली  महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मैदानात उतरलेले 26 वर्षांचे शुभम शेळके निष्प्रभ ठरले आहेत.

 

महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली होती, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज बेळगावात आली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असे पाहिले जात होते. परंतु अनपेक्षितपणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगत निवडणुकीत आली. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.