भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दुसरा गंभीर जखमी

बिल्दी धरणाजवळील घटना; पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-जळगाव रस्त्यावर असलेल्या बिल्दी धरणाजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागी ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित रघुनाथ पाटील (वय-३२) रा.आर.के. नगर, अमळनेर हा तरुण त्याचा मित्र दीपक गंगाराम पाटील (वय-३९) याच्यासोबत पाचोराहून जळगावकडे येण्यासाठी दुचाकी (एमएच १८ बीवाय ३१) याने येत होते. रस्त्यावरील बिल्ली फाट्याजवडील धरणाजवळ येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एम एच ०६ बाई ७५२८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दीपक गंगाराम पाटील (वय-३९) रा. आर.के. नगर अमळनेर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेला रोहित पाटील याला गंभीर दुखापत झाली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मयतावर शवचिच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान जखमी रोहित रघुनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात कारचालक संदीप पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विनोद शिंदे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content