भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर ते वाघोदा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मलक सलीम मलक शरीफ (वय-३५) रा. मिल्लत नगर, फैजपूर हा तरूण ८ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारस मलक अफरस मलक शरीफ आणि शेख हस्सान शेख मोहसीन याच्यासह दुचाकी (एमएच १९ सीएल १७८२) ने रावेर ते वाघोदा रस्त्यावरून जात असतांना राजदीप पेट्रोल पंपाजवळ समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १९ ईए १४८८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर मलक सलीम मलक शरीफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी २७ मे रोजी रात्री उशीरा कार वरील अज्ञात चालकावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव चौधरी करीत आहे.

Protected Content