एरंडोल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । म्हसावदरोड वरील खडके फाट्याजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात स्विफ्ट कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार काशिनाथ अहिरे (वय-३२) रा. खडके बुद्रुक ता. एरंडोल हा तरुण रविवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी (एमएच १९ एके ५२०५) ने खडके गावाहून म्हसावद रोडकडे निघाला होता. दरम्यान खडके गावाच्या फाट्याजवळ भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार क्रमांक (एमएच ४१ एएम ७४५) ने जोरदार धडक दिली. या अपघातात तुषार काशिनाथ अहिरे हा दुचाकीस्वार गंभीर दुखापत जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताच्या ४ दिवसानंतर गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहे.