भडगाव रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करा : श्री स्वामी समर्थ केंद्र व्यवस्थापकीय मंडळाची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी  । शहरातील दोघे लसीकरण केंद्र हे बाजारपेठ परिसरात असल्याने भडगाव रोड परिसारातील नागरिकांना तेथे जाणे गैरसोयीचे ठरत असल्याने  या नागरिकांसाठी श्री स्वामी समर्थ केंद्र येथे नवीन लसीकरण सुरु करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आली आहे. 

 

पाचोरा शहरातील  दोघेही लसीकरण केंद्र हे शहरातील बाजारपेठ परिसरात असल्याने, भडगांव रोड परिसरातील नागरिकांना ते लांब पडते. कधी लसीचा तुटवडा, कधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नसणे तर सर्वर डाऊन पडणे यामुळे नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे वयस्कर महिला तसेच नागरिकांना खुप त्रास सोसावा लागत आहे. ज्यांचा पहिला डोस होवून नियोजीत कालावधी झालाय त्यांना दुसरा डोस वेळेवर उपलब्ध होत नाही. शहरातील भडगांव रोड परिसरात श्री स्वामी समर्थ केंद्र हे संघवी कॉलनी येथे मध्यभागी आहे. सदर जागेत लसीकरण आपण नियोजीत करावे, सदर केंद्राचे व्यवस्थापक मंडळ आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. लसीकरणाचा हेतू साध्य व्हावा या हेतूने याबाबत योग्य विचार होवुन लसीकरण केंद्रास मंजुरी द्यावी व आपल्या यंत्रणेस तसे आदेश द्यावेत अशा आषयाचे  निवेदध जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले आहे. या निवदेनावर जितेंद्र जैन तसेच रामचंद्र जळतकर, गोकुळ पाटील (स्वामी समर्थ केंद्र, संघवी कॉलनी ) व्यवस्थापकीय मंडळ यांच्या सह्या आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!