भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सावित्रीच्या लेकींची उंच भरारी दिसून आली आहे.

काल एच.एस.सी. नाशिक बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ , भडगांव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी म्हणजेच सावित्रीच्या लेकींनी एच.एस.सी. परीक्षेत उंच भरारी घेऊन घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल विज्ञान शाखा१००%व कला शाखा ९४.६३ लागला. बारावीच्या निकालातील यशवंत विद्यार्थीनी खालीलप्रमाणे आहेत.

कला विभाग
प्रथम गायत्री गणेश सोनवणे
(८२.६७%)
द्वितीय गायत्री अभिमन्यू महाजन
(७९.००%)
तृतीय जान्हवी रवींद्र पाटील
(७८.१७%)
चौथा क्रमांक रूपाली परशुराम ईशी
(७७.८३)
पाचवा क्रमांक प्रियंका धर्मराज पाटील
(७३.६७)
विज्ञान विभाग
प्रथम जयश्री गजेंद्र पाटील
(८०.१७%)
द्वितीय मनस्वी किशोर पाटील
(८०.००%)
तृतीय साक्षी दिलीप मोरे
(७९.८४%)
चौथा क्रमांक नेहा रावसाहेब महाजन
(७९.६७)
पाचवा क्रमांक विशाखा लोटन पाटील
(७८.५०%)
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गरबड महाजन, मानद सचिव दीपक संभाजी महाजन यांच्यासह संचालक मंडळ विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.रोकडे सर, पर्यवेक्षक एस.पी.बोरसे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधु – भगिनी , शिक्षक बंधु -भगिनी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले व उत्तीर्ण विद्यर्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीत मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.