भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी शरजील इमामला अटक

imam 1

जहानाबाद (वृत्तसंस्था) दिल्लीच्या शाहीनबागमध्ये भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी शरजील इमामला अटक केली आहे. दरम्यान, शरजीलच्या वकिलांनी मात्र शर्जील स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला व त्याला नंतर अटक करण्यात आली, असा दावा केला आहे.

 

शरजील इमामचा शोध गेल्या दोन दिवसांपासून सुरु होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथकंही तयार केली होती. एवढंच नाही तर मुंबई, पाटणा आणि दिल्लीत काही ठिकाणी छापेही मारण्यात आले होते. आता आज शरजील इमामला अटक करण्यात आली आहे. जेएनयूचे मुख्य प्रॉक्टर धनंजय सिंह यांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजीलला ३ फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते. शरजीलने चिथावणी देणारे भाषण करुन विद्यापीठातील वातावरण कलुषित केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. शरजील इमाम याच्यावर पाच राज्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Protected Content