ब्रेक मारल्याने दुचाकी ट्रकवर धडकली: दुचाकीवरील बाप लेक जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा गावानजीक धावत्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकच्या मागे येत असलेली दुचाकी ट्रकवर धडकून दुचाकीवरील पिता पूत्र जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार, २१ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जामनेर तालुक्यातील टाकळी येथील शंकर नारायण जंजाळ वय ५८ हे १९ जून रोजी मुलगा सचिन याच्यासोबत त्यांच्या एम.एच. १९ ६२५३ या क्रमाकांच्या दुचाकीने जळगावहून जामनेकडे जात होते. यादरम्यान उमाळा गावानजीक दुचाकीच्या समोर चालणाऱ्या टी एन ३० २६४७ या क्रमाकांच्या ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे ट्रकच्या मागे चालणारे जंजाळ यांची दुचाकी ट्रकवर धडकली. यात अपघातात दुचाकीवरील शंकर जंजाळ तसेच त्यांचा मुलगा सचिन हे दोन्ही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दोन दिवसानंतर शंकर जंजाळ यांनी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार टी एन ३० २६४७ या क्रमाकांच्या ट्रकवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अनिश शेख हे करीत आहेत.

Protected Content