ब्रेकिंग! रावेर भाजपाच्या लोकसभा निवडणूक प्रमुखपदी  महाजन

रावेर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी भाजपाचे नंदकिशोर महाजन यांची नियुक्ती झाली आहे. या बाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या रावेर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नंदकिशोर महाजन यांची नियुक्ती झाली आहे. या बाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमात एका पत्रकाद्वारे दिली आहे. नंदकिशोर महाजन रावेर तालुक्यातील वजनदार व्यक्तीमत्व असून रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. महाजन यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातुन जास्तीत जास्त जागा भाजपाच्या निवडुन देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

Protected Content