बोरखेड ब्रु. येथे शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील बोरखेड ब्रु. येथील एका शेतकऱ्याच्या घरातील कपाटातून १ लाख दहा हजार रुपये रोकड अज्ञाताने लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बोरखेड ब्रु. येथील शेतकरी रविंद्र रामकृष्ण पाटील (वय-४५) हे कुटुंबासह शेतात गेलेले असताना घरातील कपाटातून १ लाख दहा हजार रुपये रोकड अज्ञाताने लंपास केल्याची घटना शनिवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान रविंद्र रामकृष्ण पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शेतातील मक्का पिकांचे विक्री बाजारात केल्यामुळे त्याला १,१०,००० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. त्यावर त्यांनी सदर पैसे हे घरातील कपाटातील लॉकर मध्ये ठेवून दिले. व शनिवार रोजी नेहमीप्रमाणे परीवासह शेतात निघून गेला. तत्पूर्वी त्यांनी घराला कुलूप लावून चावी हि तुळशीत लपवून दिली. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली रोकड चोरून नेले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. रविंद्र रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि प्रकाश चव्हाण हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!