बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : सरपंच तडवी यांचे आवाहन

यावल,   प्रतिनिधी ।  तालुक्यातील बोरखेडा खुर्द या गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन संर्वागीण विकास कामांना साथ देण्यासाठी सर्व  सदस्यानी विकासाच्या दुरदृष्टीकोणातुन विचार करून एकत्र येणे काळाची गरज आहे.  त्याशिवाय गावाचा विकास होवु शकत नाही असे मत लोकनियुक्त सरपंच जमशेर तडवी यांनी व्यक्त केले आहे.

 

काही दिवसापासुन ग्रामपंचायती मधील माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य हे निव्वळ विरोधासाठी विरोध करून प्रतिमाह होणाऱ्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहतात. मात्र प्रोसिडींगवर नियमाप्रमाणे आपल्या स्वाक्षरी करीत नाही.  यामुळे सदस्यांचे कोरम पुर्ण असतांना ही विकासाच्या कामांचे ठराव घेवुन त्यांना नियमाप्रमाणे मंजुरी देता येत नाही.  ग्रामपंचायतीकडे पुरेसा  निधी असतांना कुठल्याही विकास कामांना करता येत नसल्याची खंत लोकनियुक्त सरपंच जमशेर तडवी यांनी व्यक्त केली आहे.  श्री. तडवी यांनी आपल्या सहकारी सदस्यांनी लावलेले गैरकारभाराचे सर्व आरोप फेटाळुन लावले आहे . श्री. तडवी हे मागील अडीच वर्षापासुन लोकनियुक्त सरपंच म्हणुन कार्यरत आहोत.  या कालावधीत त्यांनी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या सहकार्याने गावाला जोडणाऱ्या व शेतकरी बांधवांच्या दळणवळणाच्या मार्गावरील इंगाळ नदीवर महत्वाचे पुल बांधणी केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत. गावाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांची बांधणी,  गावास नियमित पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरीता विहीरीचे खोलीकरण केले.  याशिवाय माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांच्या सहकार्याने विविध विकासाची शक्य झाली अशी विकास कामे करीत आहे.  आदीवासी बांधवांना त्यांचे  हक्काचा निवारा मिळावा म्हणुन शर्यतीचे प्रयत्न करून सुमारे ८o घरकुलांना मंजुरी मिळवली आहे.   काही  विकासाचे विधायक कामे ग्रामपंचायतच्या माध्यमातुन केली.  ग्रामस्थांच्या व गावाच्या विकासाला साथ देण्यासाठी आपण कट्टीबद्ध असून आपण केलेल्या अल्पशा: प्रत्यनाने मिळालेल्या यशाबद्दल आपणास आत्ममीक समाधान आहे.  गावाच्या विकासासाठीचे आपले कार्य हे सुरू राहणार असल्याचे तडवी यांनी म्हटले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.