बोदवड येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

बोदवड, प्रतिनिधी ।  बोदवड तालुका नाभिक समाज बांधवांकडून संत सेना महाराज पुण्यतिथी शनिवार दि. ४ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली.

 

नाभिक समाज तालुका अध्यक्ष विवेक वखरे सपत्नीक यांच्या कडून पूजा करण्यात आली व सेना महाराज यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संत सेना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र डापसे हे होते. यावेळी नाभिक समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये शारदा कैलास सुरंशे, सुचिता भगवान महाले, प्रतीक अनिल डापसे, ऋषिकेश राजाराम सोनवणे, कार्तिकेय विनोद बोरणारे, विवेक अनिल अंभोरे, मिताली राजेंद्र बिडके, किरण प्रकाश बाभुळकर, वैभव रवींद्र बोरणारे या विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आले. नाभिक समाजातील लोणवडी ग्रा.प.सदस्य बेबाबाई संजय आवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी .प्रणाली विवेक वखरे इ.3री व  रोहित विवेक वखरे इ.५वी तसेच तालुका अध्यक्ष विवेक वखरे,जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघ सर,सोपान महाले,गजानन भोंडेकर,अमोल आमोदकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तालुका सचिव गणेश सोनोने यांनी केले. आभार राजेंद्र डापसे यांनी मानले.  श्रीकृष्ण काशीनाथ तायडे यांनी मंदिरास  ५०००रु.देणगी दिली. कार्यक्रमासाठी संतोष कुंवर, विवेक वखरे, राजेंद्र डापसे, सोपान महाले, भगवान बोरसे, अनिल कळमकर, गणेश सोनोने, संजय बिडके, गजानन भोंडेकर, राजेंद्र शेळके, हरिभाऊ सुरंशे, धनराज शेळके, आकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, अशोक बोरसे, राजेंद्र महाले, योगेश वखरे, गोपाळ वखरे, जितेंद्र गणगे ,निवास बाभुळकर, राजू बाभुळकर, प्रकाश बाभुळकर, रितेश बिडके, राजेंद्र वर्मा या बरोबर अनेक नाभिक समाज बांधवांची उपस्थिती होती.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!