बोदवड : प्रतिनिधी । बोदवड़ तालुका व शहर भाजपतर्फे डॉ. राजेंद्र फडके यांची रेल्वे बोर्डावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . यावेळी त्यांना बोदवड़ रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यानां थांबा देण्याच्या मागणीचे निवदेनही देण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करून झाली.
बोदवड़ रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची सोय, गाड्यांच्या लोकेशनचे डिस्प्ले, प्रवाशांसाठी शेड या सुविधांचा अभाव असल्याचे बोदवड़ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले. बोदवड़ एजुकेशन सोसायटीचे सचिव विकास कोटेचा यांनी बोदवड़ रेल्वे स्टेशन भारतीय रेल्वेच्या नियमाप्रमाणे D ग्रेडच्या NHGS 5 मध्ये येते हे रेल्वे स्टेशन ३ वर्षापासून रेल्वेला 5-6 एक्सप्रेस गाड्या थांबतील एवढे उतपन्न देत आहे. तरीही बोदवड़ स्टेशनला ३ च एक्सप्रेस गाड्यांच्या थांबा असल्याचे निर्दशनास आणून दिले.
बोदवड़करांच्या रेल्वे प्रश्नासाठी झटणारे सुरेश वर्मा यांनीसुद्धा डॉ. राजेंद्र फडके यांना निवदेन दिले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बिहारी आहूजा यांनीही त्यांच्या मागण्या मांडल्या
डॉ राजेंद्र फड़के यांनी सांगितले की एका गाड़ीला एक नवीन थांबा करण्यासाठी २० मिनिट उशीर होतो बोदवड़शेजारी भुसावल हे नॅशनल जंक्शन आहे आणि शेजारीच किमीवर विदर्भ हद्द सुरु होते मलकापुरला थांबा देणे गरजेचे असल्याने बोदवड़ रेल्वे स्टेशनला थांबा देण्यासाठी तांत्रिक अडचणी येतात तरीही कोविडसदृश्य परिस्थिती संपताच नवजीवन एक्सप्रेसला थांबा मिळवून देईल .
याचवेळी बोदवड़चे माजी उपसरपंच संजय बडगुजर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. डॉ. राजेंद्र फड़के व अशोक कांडेलकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. व्यापारी संघटनेतर्फे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, कैलास जावरे, अनुप हजारी, सतीष भूतड़ा, विलास बारी, अनील जड़े यांनी डॉ. फड़के यांचा सत्कार केला. भाजपा बोदवड़ तालुका व शहर, दिव्यांग आघाडी, चित्रपट कामगार आघाडी तसेच विविध संघटनांकडून डॉ. राजेंद्र फड़के यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक कांडेलकर, मार्गदर्शक अनंता कुलकर्णी, जिल्हा कोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, बोदवड़ तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, मुक्ताईनगर तालुका सरचिटणीस विनोद पाटील, बोदवड़ तालूका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, तालुका उपाध्यक्ष भागवत चौधरी, शहराध्यक्ष नरेश आहुजा , शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, दिलीप घुले, संजय अग्रवाल, गजानन शेळके ( ग्रा पं सदस्य मनूर ), डॉ. ब्रिजलाल जैन, उमेश गुरव (तालुकाध्यक्ष, चित्रपट कामगार आघाडी), रोहित अग्रवाल (मिडिया प्रमुख), विक्रम वरकड (तालुकाध्यक्ष, युवा मोर्चा), गोपाल अग्रवाल (अध्यक्ष, व्यापारी संघटना ) , पंकज चांदुरकर , कृष्णा जाधव , राम अहुजा , भास्कर आवारे, संतोष बारी, विजय जोशी , वैभव माटे , जीवन माळी , सोपान ताठे , मयूरेश शर्मा , भूषण देशमुख , विनायक निरखे, रविन चोरडिया, निलेश देशमुख, विशाल किरोते , अभिषेक जैन , गजानन माळी , किशोर माळी , संतोष चौधरी , वैशाली कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष, चित्रपट कामगार आघाडी) , अनिता अग्रवाल (जिल्हा सरचिटणीस, दिव्यांग आघाडी) , लता तायडे (जिल्हा उपाध्यक्ष, चित्रपट कामगार आघाडी) , ललिता चौधरी , सुरेखा शर्मा , मनोरमा जैस्वाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक भाजपाचे मार्गदर्शक अनंत कुलकर्णी यांनी व सूत्रसंचालन उमेश गुरव यांनी केले आभार वैभव माटे यांनी मानले