बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

जळगाव, प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. २,३,१५,१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यादिवशी सदर नगरपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मतदानाकरीता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाने बोदवड नगरपंचायतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार ना. मा. प्र. करीता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार १८ जानेवारी रोजी मतदान होणाऱ्या नगरपंचायत बोदवडच्या प्रभाग क्र. २,३,१५,१७ च्या क्षेत्रातील मतदारांसाठी स्थानकि सुटृटी जाहिर करण्यात आली आहे. सदर सुट्टी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, कॉल्स, रिटेलर्स आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!