जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका झाडासमोरून एका नोकरदाराचे २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या संदर्भात मंगळवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्निल शालिग्राम पाटील (वय-३४, रा. छत्रपती संभाजीनगर, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून तो आपला उदारनिर्वाह करत असतो. १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता तो त्याच्या कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील असलेल्या पेट्रोल पंपाच्यामागे दुचाकी (एमएच १९ बीएक्स ०१५८) ने आला होता. त्यावेळी एका झाडाखाली त्याने दुचाकी पार्क करून लावली होती, दरम्यान अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वप्नील पाटील याने दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी मिळून आली नाही. अखेर त्याने मंगळवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहे.