बुलडाण्यात जोरदार पावसाला सुरुवात : सोनाळा येथील नदीला पहिलाच पूर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती, खरीपाची पूर्ण तयारी झाली होती. मात्र पाऊस येत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज शनिवारी पावसाने सुरुवात केली त्यामुळे थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.

 

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली होती, मात्र आज दणक्याने पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नागरिकाना उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. यातच आज बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा गावातील परिसराच्या लगत भागात झालेल्या दमदार पावसामुळे नदीला पहिलाच पूर आल्याने पावसाची दमदार इंट्री झाल्याचे बोलल्या जात आहे. तर एकंदरीत ज्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते त्यांना आता काहीचां दिलासा मिळाला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!