बुलडाणा जिल्ह्यात ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु

 

    खामगाव : प्रतिनिधी । बुलडाणा  जिल्ह्यामध्ये आजपासून  ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

लसीकरण मोहीमेस आज ७ आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे.  यामध्ये जिल्हा रुग्णालय बुलडाणा, ग्रामीण रुग्णालय चिखली,  ग्रामीण रुग्णालय जळगांव जामोद ,  उप जिल्हा रुग्णालय शेगांव, ग्रामीण रुग्णालय मेहकर, प्रा.आ.केंद्र बोराखेडी (ता. मोताळा ), प्रा.आ.केंद्र नांदुरा आदींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच लसीकरण मोहीम कार्यान्वित होईल, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ गोफणे यांनी कळविले आहे.

 

Protected Content